मुंबईला वाचवण्यासाठी तालिबानी मानसिकतेपासून सावध रहा !
मुंबईकर जागे रहा !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदूंची संख्या न्यून होत आहे का ? आणि जिहादचा अर्थ अन् त्याचे प्रकार’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग ७
भाग ६. वाचण्यासाठी क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/859798.html
८. हिंदूंनी यातून काय बोध घ्यायला हवा ?
आपला भारत देश हा सहिष्णू आणि महान आहे. महाराष्ट्र हा भारताचा कणा आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी नव्हे, तर देशाची आर्थिक राजधानी आहे. याच मुंबईला घेरण्याचा हळूहळू प्रयत्न होत आहे. जसे बंगाल आणि काश्मीर येथे घडत आहे, तसाच प्रयोग मुंबईत राबवला जात आहे. हे उद्योग हाणून पाडायला हवेत. ‘अखंड सावधान’ रहाण्याचे समर्थांचे वचन कायम स्मरणात ठेवले पाहिजे. आपल्या वस्त्या सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. तिथे या तालिबानी मानसिकतेला शिरकाव करू देता कामा नये.
९. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना रोखण्यासाठी उपाय
अ. ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत, त्या विरोधात सामाजिक माध्यमे, मासिके, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांद्वारे आवाज उठवायला हवा. प्रसिद्धीमाध्यमांनी यावर शोधपत्रकारिता करून या सर्व गोष्टी उघड करायला हव्यात.
आ. केवळ मुंबईपुरतेच नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि जगभरात या समस्यांविषयी जाणीव करून द्यायला हवी.
इ. अशा विषयांवर नाटके, चित्रपट आणि पथनाट्ये इत्यादींच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायला हवे.
ई. सरकारने अशा घटनांकडे लक्ष देऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करायला हवी आणि तालिबानी वृत्तीच्या लोकांना पायबंद घालावा.
उ. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करायला हवी.
ऊ. पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येता ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’, हे तत्त्व आचरणात आणून तालिबानी मानसिकतेला कायद्याने ठेचून काढले पाहिजे.’
(समाप्त)
– श्री. मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.