जिज्ञासू महिलेचे अनेक वर्षे घराच्या संदर्भातील रखडलेले काम तिने कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप केल्याने पूर्ण होणे
‘मी पूर्वी एका संप्रदायाच्या माध्यमातून साधना करत होते. रत्नागिरी येथील साधक श्री. भार्गव वझे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे) यांनी मला सनातन संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. त्यांनी मला कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मी कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्यास आरंभ केला. मी हे नामजप केल्याने मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. जिज्ञासू महिलेच्या भाडेकरूने भाड्याचे पैसे न देणे आणि त्याने जागेत पोटभाडेकरू ठेवणे : माझ्या यजमानांचे १६ वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर मला पुष्कळ आर्थिक अडचणी आल्या. तेव्हा मला अकस्मात् सर्व व्यवहार पहावे लागले. पुणे येथील धनकवडी परिसरात माझी सदनिका होती. तेथे अनेक वर्षे एक भाडेकरू रहात होता. माझ्या यजमानांचे निधन झाल्यानंतर ‘मी एकटी आहे’, हे त्याला समजले. तेव्हा त्याने मला भाड्याचे पैसे देणे बंद केले. त्याने मला कोणतीही कल्पना न देता माझ्या जागेत पोटभाडेकरू ठेवले. तो त्यांच्याकडून घरभाडे घेऊ लागला. मी पुष्कळ प्रयत्न केले; पण त्याने मला दाद दिली नाही.
२. जिज्ञासू महिलेने भाडेकरूच्या विरोधात पुरावे गोळा करणे : मी वर्ष २०२३ मध्ये त्याच्या विरोधात गार्हाणे नोंदवले. मी एका सद़्गृहस्थांच्या साहाय्याने ‘त्या भाडेकरूने कसे पोटभाडेकरू ठेवले आहेत, तसेच त्याने मला भाडे देणे थांबवले’, याविषयीचे पुरावे एकत्र केले. मी जून २०२३ पासून असे प्रयत्न करत होते.
३. मी धनकवडी परिसरात असलेल्या श्री शंकर महाराज मठात जाऊन श्री शंकर महाराज यांना प्रार्थना केली. माझा दत्ताचा नामजपही चालू होता. एप्रिल २०२४ मध्ये तो भाडेकरू घर सोडून गेला. त्या सदनिकेची विक्री होऊन तो व्यवहारही पूर्ण झाला.
अनेक वर्षे रखडलेले माझे घराचे काम मी नामजप आणि प्रार्थना केल्यामुळे पूर्ण झाले. ‘ही माझ्यावर झालेली गुरुकृपाच आहे’, असे मला वाटते.’
– श्रीमती रश्मी रवींद्र कुलकर्णी, पुणे (९.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |