Maharashtra Swearing-In Ceremony : साधू-संतांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भव्य शपथविधी सोहळा होणार !

१९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण !

मुंबई – ५ डिसेंबर या दिवशी आझाद मैदानात साधूसंतांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित रहातील. भारतातील १९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे. सोहळ्याला २ सहस्र विशेष महनीय व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. ३ डिसेंबर या दिवशी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी सोहळ्याच्या सिद्धतेची पहाणी केली.

महायुतीचे १० सहस्र कार्यकर्ते ‘एक है, तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) अशी घोषणा लिहिले टी-शर्ट घालून सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत.