‘भारतीय दूरचित्रवाहिन्यांवर बंदी घाला !’ – बांगलादेशातील उच्च न्यायालयात याचिका

बांगलादेशातील उच्च न्यायालयात याचिका

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – भारतीय दूरचित्रवाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका बांगलादेशाच्या उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. या याचिकेत बांगलादेशी संस्कृती आणि समाज यांवर भारतीय प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अधिवक्ता इखलास उद्दीन भुईयाँ यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन अ‍ॅक्ट २००६’ अंतर्गत बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांचे सचिव, तसेच बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

स्टार जलसा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय वाहिन्या यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय वाहिन्यांच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणार्‍या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुणांवर होत असल्याचे म्हटले आहे. या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

भारताकडून मिळणारी वीज, अन्नधान्य, औषधे आदींच्या जिवावर जगणारे धर्मांध बांगलादेशी मुसलमान उद्दाम झाले असून त्यांना आता योग्य धडा शिकवण्यासाठी भारतानेही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. भारताने आता हे धाडस दाखवणे आवश्यक आहे !