जिज्ञासू महिलेच्या मुलाचे अनेक प्रयत्न करूनही लग्न न जुळणे आणि त्या महिलेने कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप केल्यावर आणि घरात नामपट्टी लावल्यावर तिच्या मुलाचे लग्न जुळणे
‘चंदननगर, पुणे येथील सौ. विजया अरुण भंडारे शिक्षिका आहेत. वर्ष २०२० पासून त्या सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाला जोडतात. त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या नोंदणीच्या संदर्भातील सेवा करतात. त्या अन्य सेवाही करतात. त्यांनी एका जिज्ञासू महिलेला नामजपाविषयी आणि घरात देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावण्याविषयी सांगितल्यावर त्या जिज्ञासू महिलेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘मी सेवेला जातांना माझ्या समवेत देवतांच्या नामजपाच्या १०० ते १५० पिवळ्या नामपट्ट्या ठेवते. मी प्रवास करत असतांना माझ्याकडून नामपट्ट्या वितरण करण्याची सेवा होते.
एकदा मी एका ओळखीच्या ताईंना नामजपाचे महत्त्व सांगून नामपट्टी दिली. त्यांनी ती घरात लावली. नंतर काही दिवसांनी माझी त्यांच्याशी पुन्हा भेट झाली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘माझ्या मुलाचे लग्न जुळत नव्हते. आम्ही अनेक प्रयत्न करूनही त्याचे लग्न जुळण्यात अडथळे येत होते. मी तुम्ही सांगितलेला कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केल्याने अन् घरात नामपट्टी लावल्यावर माझ्या मुलाचे लग्न जुळले.’’
त्यांना आलेली ही अनुभूती ऐकून मला गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती कृतज्ञता वाटली.
गुरुदेव मला या सेवेतून शिकवत आहेत आणि मला घडवत आहेत. यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. विजया अरुण भंडारे, चंदननगर, पुणे. (९.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |