देवस्थानाच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी जत्रोत्सवात धर्मांधांना गाळे लावण्यास अनुमती देऊ नये
डिचोली येथील ‘हिंदू युवा शक्ती’ची मागणी
डिचोली (गोवा), ३ डिसेंबर (वार्ता) – डिचोली येथील ‘हिंदू युवा शक्ती’च्या वतीने जत्रोत्सवात देवस्थानचे पावित्र्य टिकवण्यासाठी एक मोहीम चालू करण्यात आली आहे. डिचोली येथे पुढच्या आठवड्यात ९ डिसेंबर २०२४ या दिवशी होणार्या नव्या सोमवारच्या निमित्ताने श्री शांतादुर्गा देवस्थान समिती आणि बाजारकर मंडळ यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात देवस्थानाच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी जत्रोत्सवामध्ये अन्य धर्मियांना देवस्थानाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे गाळे (स्टॉल) लावण्यास अनुमती न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात जत्रोत्सवामध्ये मंदिराच्या आवारात भक्तांची एकत्रित पूजा अन् धार्मिक विधी होत असतात. या वेळी पवित्रतेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून जत्रोत्सवात धर्मांध मुसलमानांचे गाळे (स्टॉल) असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होण्याची शक्यता आहे. धर्मांध मुसलमानांकडून अयोग्य अन् किळसवाणे ‘लव्ह जिहाद’ अन् ‘थुंकी जिहाद’ यांसारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे हिंदु महिलांच्या दृष्टीने असुरक्षितता निर्माण होऊन संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे देशभरात जिहाद्यांकडून होत असलेल्या हिंदु धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी घटनांचीसुद्धा गंभीर नोंद घेऊन जत्रोत्सवात मांसाहार आणि गोमांसभक्षण करणार्या गाळेधारकांना मंदिराच्या आवारात स्थान न देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासह अनुमती मिळालेल्या हिंदु गाळेधारकांनी कोणत्याही परिस्थितीत अन्य धर्मीय कामगारांना कामावर ठेवण्यास मनाई करावी, अशीदेखील मागणी केली आहे.
इतर गावांमध्ये होणार्या जत्रोत्सवाच्या निमित्तानेसुद्धा पिळगाव येथील श्री शांतादुर्गा देवस्थान समिती, म्हावळींगे येथील श्री सातेरी केळबाई देवस्थान, कुडचिरे येथील श्री केळबाई देवस्थान आणि इतर संबंधित समित्यांना ही मागणी सादर करण्यात आली आहे. कुडचिरे येथे श्री केळबाई मंदिरात गावातील जमलेल्या लोकांचे या निमित्ताने प्रबोधन करण्यात आले. या निमित्ताने हिंदू युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी हिंदु धर्माबद्दल जागृती करण्याच्या संधीचा लाभ घेतला.
संपादकीय भूमिकाहिंदूंना जागृत करणासाठी पुढाकार घेणार्या हिंदू युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! |