महाराष्‍ट्र पोलीस दलात ३३ सहस्रांहून अधिक पदे रिक्‍त !

नागपूर – महाराष्‍ट्र पोलीस दलात २ लाख २१ सहस्र २५९ संमत पदांपैकी ३३ सहस्रांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्‍यात महिला पोलिसांच्‍या १६.६ टक्‍के पदांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

१. आंतरराष्‍ट्रीय प्रमाणानुसार, कायदा-सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी १ लाख लोकसंख्‍येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत; मात्र भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचार्‍यांपेक्षाही ७० ने अल्‍प पोलीस आहेत.

२. अनेकदा पोलीस कर्मचारी अन्‍वेषण सोडून अतीमहत्त्वाच्‍या व्‍यक्‍तींच्‍या दौर्‍यात आणि बंदोबस्‍तांमध्‍ये गुंतलेले असतात. त्‍यामुळे गुन्‍हेगारी वाढत आहे.

संपादकीय भूमिका

राज्‍यातील वाढती गुन्‍हेगारी आणि कायदा-सुव्‍यवस्‍था यांची ढासळती स्‍थिती पहाता ही रिक्‍त पदे तातडीने भरणे आवश्‍यक !