महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये सुटी, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा !
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ३ डिसेंबर या दिवशी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर चैत्यभूमी येथील सोयीसुविधांविषयी ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ६ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून मुंबईपुरती स्थानिक सुटी घोषित करण्यात आली आहे.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाला उपस्थित रहाण्यासाठी भारतातील विविध राज्यांसह विविध देशांतून नागरिक मुंबईत येतात. या सर्वांचे भोजन, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, रहाण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, समन्वय कक्ष आदी सेवांचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला.