Eknath Shinde Health : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथील रुग्णालयातून बाहेर !
ठाणे – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील ज्युपिटर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी करण्यात आली होती; मात्र दोन्ही चाचण्या निगेटिव्ह (नकारात्मक) आल्या आहेत. पांढर्या पेशी न्यून-अधिक होत असल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असली, तरीही आधुनिक वैद्यांनी डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तपासणीनंतर ते रुग्णालयातून निघून मुंबईच्या दिशेने गेले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मी चेकअपसाठी आलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे.’’