Nitin Gadkari On Politics : राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर – राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येक जण दु:खी आहे. नगरसेवक आमदारकीची संधी न मिळाल्याने दु:खी असतो. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज असतो. एखादा मंत्री चांगले खाते न मिळाल्याने दुःखी असतो, तर चांगले खाते मिळालेला मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून दुःखी असतो.

त्याच वेळी मुख्यमंत्र्याला पक्षाध्यक्ष कधीही पद सोडण्यास सांगतील याची भीती असते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण्यांची मानसिकता स्पष्ट केली. ते येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.