Bangladeshi Tourist Not Allowed : बांगलादेशी पर्यटकांना त्रिपुरामधील हॉटेलांमध्ये उतरण्यास बंदी ! – त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटना

आगरतळा – बांगलादेशाला लागून असलेल्या त्रिपुरा या ईशान्येकडील राज्याने एक मोठी घोषणा केली आहे. त्रिपुरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना बांगलादेशी पर्यटकांकडून आरक्षण स्वीकारणार नाही. ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने (ए.एच्.टी.आर्.ओ.ए.ने) हा निर्णय घेतला आहे. ‘बांगलादेशात भारतीय ध्वजाचा अपमान होत असल्याने आम्ही बांगलादेशी पाहुण्यांना सेवा देणार नाही. तसेच कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये त्यांना अन्न पुरवले जाणार नाही’, असे हॉटेल मालकांनी सांगितले.

१. बांगलादेशात हिंदु अल्पसंख्यांकांवरील अत्याचार वाढत आहेत. तेथे महंमद युनूस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तेथील कट्टरपंथी मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत आहेत. हिंदूंना पूजा करण्यापासून रोखले जात आहे. हिंदु मंदिरांवरील आक्रमणे वाढत आहेत. बांगलादेशात भारतीय ध्वजाचा अवमान केला जात आहे. तेव्हापासून भारताच्या अनेक भागांमध्ये बांगलादेशाच्या विरोधात निदर्शने चालू झाली आहेत.

२. आगरतळा येथील एका खासगी रुग्णालयाने नुकताच बांगलादेशी नागरिकांवर उपचार न करण्याचा निर्णय घेतला.

३. बांगलादेशातील हिंदु नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे बांगलादेशी वाभोवती भव्य मोर्चा काढला.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांचा निषेधार्थ अशी भूमिका घेणार्‍या संघटनेचे अभिनंदन !