Israel Banned Mosques Speakers : मशिदींवरील सर्व भोंग्यांवर बंदी घालून ते जप्त करा ! – इस्रायल

  • इस्रायल सरकारचा पोलिसांना आदेश

  • भोंग्यांवरून मोठा आवाज होत असल्याच्या तक्रारींनंतर आदेश

  • मुसलमानांकडून दंगली होण्याची धमकी

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे संरक्षणमंत्री इतामार बेन-गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्ये भोंगे लावण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भोंगे काढून जप्त करण्याचे आणि तसे न केल्यास मशिदीवर दंड ठोठावण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. पूर्व जेरूसलेम आणि इतर अनेक भागांतील मशिदींवरील भोंग्यांद्वारे मोठा आवाज येत असल्याच्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले.

१. या आदेशानंतर त्याला विरोध करण्यात येत आहे. काही शहरांच्या महापौरांनी सांगितले की, आम्ही बेन-गवीर यांच्या आदेशाकडे मुसलमानांच्या विरोधात चिथावणी देणारी कृती म्हणून पहातो ज्यामुळे दंगली होऊ शकतात.

२. पॅलेस्टाईन नॅशनल कौन्सिलने मशीद आणि धार्मिक स्वातंत्र्य यांवर आक्रमण असल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध केला.

संपादकीय भूमिका

  • भारतात अनेक दशके अशा प्रकारचा त्रास होत असतांना आणि तक्रारी करून अन न्यायालयाने आदेश देऊनही बंदी घातली जात नाही, हे लक्षात घ्या !
  • आता भारतालाही इस्रायलच्या शासनकर्त्यांप्रमाणे शासनकर्ते हवेत, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • धर्मांध मुसलमानांना दंगली करण्यासाठी कोणतेही कारण चालते. ते नेहमीच जगाच्या पाठीवर दंगली करण्यासाठीच सिद्ध असतात, असेच यातून पुन्हा लक्षात येते !