फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्ये भूस्खलन : ७ जण बेपत्ता
चेन्नई (तमिळनाडू) – ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नमलाई येथील एका टेकडीवर भूस्खलन झाले. सुमारे ४० टन वजनाचा खडक डोंगरावरून खाली कोसळला आणि येथील रस्त्याजवळील वरील घरांवर पडला, ज्यामुळे २ घरे कोसळली. त्यांच्या ढिगार्याखाली ७ जण अडकल्याची भीती आहे.