पुढील वर्षीच्या भाऊबीजेपासून ‘लाडक्या बहिणी’चे २ सहस्र १०० रुपये देण्याचा निर्णय घेऊ ! – सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते
मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेले २ सहस्र १०० रुपये देण्याचे आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करू. ती रक्कम वाढवली नाही, तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर ‘आश्वासन पूर्ण न करणारे’ अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २ सहस्र १०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी कि जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची, यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षीच्या भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.