परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे अमेरिकेतील घडामोडींविषयीचे भाष्य !
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी करून दाखवले. अमेरिकेच्या देशांतर्गत सर्वोच्च केंद्रीय चौकशी संस्थेच्या (‘एफ्.बी.आय.’च्या) प्रमुखपदी भारतियाची निवड केली. काश पटेल हे ‘एफ्.बी.आय.’चे नवे प्रमुख ! पहिल्यांदाच एका भारतियाला हा बहुमान. ट्रम्प यांच्या काळात भारताला सुखावणार्या अशा अनेक आश्चर्यचकित करणार्या घटना बघायला मिळणार हे नक्की.
भारतासह बांगलादेशातील हिंदू वाट बघत आहेत जानेवारी मासाची, जेव्हा डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. हा जगातील पहिला नेता आहे, ज्याने उघडपणे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यांच्या रक्षणाचा निर्धार केला. शेख हसीनांच्या १५ वर्षांच्या पंतप्रधान कार्यकाळात बांगलादेशामधील हिंदू सुरक्षित होते. हसीनांच्या सत्तेतून जाण्यानंतर हिंदूंवर अत्याचार वाढले. महंमद युनूस यांच्या कार्यकाळात या अत्याचाराने आणखी तीव्र रूप धारण केले आहे; पण याविरोधात अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन, पश्चिमी प्रसारमाध्यमे काहीच बोलायला सिद्ध नाहीत; कारण युनूसला त्यांनी सत्तेत बसवले आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१.१२.२०२४)