मुंबईला वाचवण्‍यासाठी तालिबानी मानसिकतेपासून सावध रहा !

मुंबईकर जागे रहा !

भाग ६

भाग ५. वाचण्यासाठी क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/859484.html

‘नुकतेच ‘टाटा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ सोशल सायन्‍सेस’, या संस्‍थेने एक अहवाल प्रसिद्ध केला, जो मुंबईकरांसाठी अतिशय धक्‍कादायक असा होता. ‘बांगलादेश आणि म्‍यानमार येथून बांगलादेशी अन् रोहिंग्‍या मुसलमानांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्‍याने वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्‍या ५४ टक्‍क्‍यांच्‍याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्‍या ३० टक्‍क्‍यांहून वाढेल’, असे या अहवालात म्‍हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदूंची मुंबईतील भयावह स्‍थिती दर्शवणारी ‘मुंबईकर जागे रहा !’, ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. २ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘हिंदूंची संख्‍या न्‍यून होत आहे का ? आणि शैक्षणिक स्‍तरावरही मुसलमानांना झुकते माप दिले गेले’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

३. राजकीय, सामाजिक, आर्थिक या सर्व क्षेत्रांतील समीकरणे लोकसंख्‍येमुळे प्रचंड मोठ्या संख्‍येने पालटतात.

४. राजकीय परिणाम

राजकारणाचा विचार केला गेला, तर मुसलमान नगरसेवक आणि आमदार यांची संख्‍या आपल्‍याला दिसून येईल. जोपर्यंत भारतीय राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि स्‍वराज्‍य निर्मितीची संकल्‍पना अग्रस्‍थानी होती, तोपर्यंत भारतीय स्‍वातंत्र्याचा लढा हा योग्‍य दिशेने जात होता. ती संकल्‍पना जेव्‍हा भारतीय पुढार्‍यांनी बाजूला ठेवली, तेव्‍हा मात्र भयावह अशा फाळणीला सामोरे जावे लागले, हे कटूसत्‍य आहे.

५. आर्थिक राजधानीत हिंदूंचा न्‍यून होत असलेला सहभाग !

आर्थिक सत्ता हस्‍तगत करून राजकीय सत्ता काबीज करण्‍याची इंग्रजांची नीती इथे इत्‍यंभूतरित्‍या अवलंबली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून अतिशय शांतपणे; परंतु एक पुष्‍कळ मोठी योजना आखून मुसलमान समाज मुंबईतील विविध व्‍यापारांना आपल्‍या हाती घेत आहे. उदाहरणार्थ २० वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व विक्रेत्‍या कोळी महिला असायच्‍या; पण त्‍यांची संख्‍या ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. मुंबईत पूर्वी कोल्‍हापूर आणि कोकण भागातील लोक छोटी दुकाने लावून भाजीपाला, फळभाज्‍या विकत असत; पण आज तेही १० टक्‍क्‍यांहून अधिक लोक उरलेले नाहीत. मुंबईत छोटा व्‍यवसाय असो किंवा मोठा व्‍यवसाय, आज सलून व्‍यवसायात २० टक्‍केही हिंदू उरलेले नाहीत. ‘हाऊसकिपिंग’ (गृहव्‍यवस्‍थापन) आपल्‍याला लक्षात येत नाही; पण जिथे मुसलमानांनी एकेकाळी ‘हाऊसकिपिंग’ हाती घेतले होते, सद्यःस्‍थितीत मुंबईत ९० टक्‍क्‍यांहून अधिक कर्मचारी केवळ मुसलमानच ठेवले जात आहेत. ‘ओला’, ‘उबेर’ (चारचाकी वाहने भाड्याने उपलब्‍ध करून देणारी खासगी आस्‍थापने), तसेच एकेकाळी टॅक्‍सी आणि रिक्‍शा यांच्‍या व्‍यवसायात ८० टक्‍क्‍यांहून अधिक हिंदू होते. आज त्‍या टक्‍केवारीत घट होऊन अर्ध्‍याहून अधिक न्‍यून झाली आहे. अशा विषयांची सूची पुष्‍कळ मोठी आहे; पण हिंदू मानसिकतेनुसार ‘आपल्‍या घरात आग लागेपर्यंत ही आग विझवण्‍याचे दायित्‍व दुसर्‍याचे आहे’, असे समजून आपण शांत रहातो. महामार्गावरील सगळे ढाबे आणि उपाहारगृहे जिथे बाहेर नाव काहीही असले; परंतु तिथे आत गेल्‍यावर कळेल, त्‍या जागेचा मालक कोण आहे ? समुद्रकिनारी असलेल्‍या सर्व भूमींचा गेल्‍या २० वर्षांत झालेल्‍या व्‍यवहारांची संख्‍या जर आपण बघायला गेला, तर लक्षात येईल की, सर्वाधिक व्‍यवहार हे मुसलमानांच्‍या बाजूने झाले आहेत. एखाद्या इमारतीत किंवा वसाहतीमध्‍ये आधी महागड्या किंमतीत दुकान किंवा घर विकत घेणे आणि नंतर त्‍यांची कार्यपद्धत, तेथील लोक ज्‍या पद्धतीने अप्रसन्‍न होतात, ते पहाता लोक अर्ध्‍या किंमतीत घर किंवा दुकाने विकून निघून जातात, हे हळूहळू लक्षात येते.

‘आपण हे वाचल्‍यानंतर झोपणार का ?’ आपल्‍यात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे रक्‍त आहे आणि म्‍हणून आपले पूर्वज ज्‍या प्रकारे आपल्‍या धर्मरक्षणासाठी लढले, तसे आपल्‍याला लढणे शक्‍य नाही; परंतु किमान जागे रहायला हवे आणि तशी वेळ आता आली आहे.

६. जिहादचा अर्थ आणि त्‍याचे प्रकार

‘देशात हिंदु हा बहुसंख्‍य आणि सहिष्‍णू आहे. हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे; पण हे सर्व करतांना हिंदूंनी स्‍वतःच्‍या अस्‍तित्‍वाचाही विचार करायला हवा. आपल्‍या सहिष्‍णुतेचा अपलाभ घेऊन हिंदूंचे अस्‍तित्‍व न्‍यून करणार्‍या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे. यासाठी काश्‍मीर, बंगाल आणि आसाम येथील घटनांमधून बोध घेता येईल.

६ अ. जिहाद म्‍हणजे काय ? : या शब्‍दाला कुराणात फार महत्त्वाचे स्‍थान प्राप्‍त झालेले आहे. जिहादचा सर्वसामान्‍यपणे अर्थ घेतला जातो तो म्‍हणजे धर्मयुद्ध ! परंतु इस्‍लामिक तत्त्वज्ञानांच्‍या मते त्‍याला व्‍यापक अर्थ आहे. जिहाद हा मूळ अरबी शब्‍द. जिहाद याचा अर्थ प्रयत्न करणे, पराकाष्‍ठा करणे किंवा संघर्ष करणे. हा संघर्ष स्‍वतःतील वाईट प्रवृत्तीविषयी करायचा आहे. जिहाद म्‍हणजे आत्‍मशुद्धी. ज्‍याला ‘जिहाद अल अकबर’, असे म्‍हटले जाते. हा श्रेष्‍ठ प्रकार आहे.

६ आ. धर्मांध इस्‍लामी मूलतत्त्वांच्‍या मते जिहादची भयावहता : जिहादचे अनेक प्रकार आहेत. उघड उघड युद्ध करणे शक्‍य नाही; म्‍हणून लव्‍ह जिहाद, भूमी जिहाद, अमली पदार्थ जिहाद अशा अनेक प्रकारे जिहाद केला जाऊ लागला आहे.

६ आ १. लव्‍ह जिहाद : हा शब्‍द सर्वांच्‍या परिचयाचा आहे. लव्‍ह जिहाद या शब्‍दाचा प्रयोग कोण्‍या हिंदु संघटनेने केला नाही, तर सर्वप्रथम केरळ उच्‍च न्‍यायालयाद्वारे करण्‍यात आला. लव्‍ह जिहाद, म्‍हणजे मुसलमान तरुणांना सांगितले जाते की, काहीही करून हिंदूच्‍या किंवा इतर धर्माच्‍या मुलींना फूस लावून, बळजोरीने किंवा कुठल्‍याही मार्गांनी तुमच्‍याशी लग्‍न करायला भाग पाडा. त्‍यांचे धर्मांतर करा. अशा प्रकारच्‍या चर्चा बाहेर समाजमाध्‍यमात, वर्तमानपत्रात वाचण्‍यात येतात. यात २० टक्‍के ते ३० टक्‍के मुली बेपत्ता होतात, असेही अनेक अहवालातून समोर येते. या संदर्भात अशा प्रकरणाची योग्‍य ती चौकशी होऊन त्‍यातील सत्‍य बाहेर आले पाहिजे. जर अशा घटना घडत असतील, तर दोषींवर योग्‍य कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात केरळ उच्‍च न्‍यायालयाने ‘एक कठोर कायदा बनवावा’, अशीही मागणी वर्ष २००९ मध्‍ये करण्‍यात आली. यावरील सुनावणी अभ्‍यास करण्‍यासारखी आहे.

६ आ २. अमली पदार्थ (ड्रग्‍ज) जिहाद : जिहादचा दुसरा प्रकार, म्‍हणजे ‘ड्रग्‍ज जिहाद’. हा मुंबईत मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्‍याचा उद्देशच मुळात मुंबईतील तरुणांना व्‍यसनाधीन बनवणे.

६ आ ३. भूमी जिहाद : आता सगळ्‍यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद ज्‍याची भयानकता हिंदूंच्‍या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी जिहाद ! सरकारी जागेत बेकायदारित्‍या अतिक्रमण करत झोपड्या उभ्‍या करून अवैध वस्‍ती निर्माण केली जात आहे. मालवणीत मोठ्या प्रमाणात अवैध वस्‍ती वसलेली आहे. हा भूमी जिहादचा प्रकार का म्‍हणू नये ? कारण स्‍थलांतरित होणारे लोक हे स्‍थानिक नसून बाहेरून आलेले रोहिंग्‍या असण्‍याची शक्‍यता आहे. अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्‍या लोकवस्‍ती निर्माण झाल्‍यानंतर लोकसांख्‍यिकीय रचनेमध्‍ये पालट होतो आणि याचा परिणाम राजकीय घडामोडींवर होतो.

७. निधर्मीवाद्यांची पालटलेली रणनीती

हळूहळू हा ‘सेक्‍युलरी’ (निधर्मी) कावा हिंदूंच्‍या लक्षात यायला लागला आहे. त्‍यामुळे आता याच कथित ‘सेक्‍युलर’ लोकांनी स्‍वतःचा रोख थोडा पालटला आणि हिंदु देवता, महापुरुष यांना अपकीर्त करायची मोहीम चालवली. याचे ज्‍वलंत उदाहरण म्‍हणजे स्‍वातंत्र्यवीर सावरकर. थोडे काही झाले किंवा एखादी गोष्‍ट या ‘सेक्‍युलर’ मंडळींच्‍या विरोधात जायला लागली की, हे लगेच सावरकर यांच्‍या अपकीर्तीचे मथळे चालवतात. रावण, महिषासुर अशा असुरांना नायक बनवण्‍यात येते. हिंदु सण पर्यावरणाला कसे घातक आहेत, नैसर्गिक साधनांची उधळपट्टी करणारे आहेत, अशा प्रकारे सांगितले जाते. हिंदु परंपरांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक मुसलमान होते’, अशी अफवा पसरवली जाते.  जेव्‍हा महाराजांच्‍या लक्षात आले की, ‘मंदिरे पाडून तिथे मशिदी उभ्‍या केल्‍या आहेत’, तेव्‍हा त्‍यांनी ‘त्‍या मशिदी पाडून तिथे मंदिरे पुन्‍हा उभी केली आहेत.’ हे सत्‍य ही तथाकथित ‘सेक्‍युलर’ मंडळी तुम्‍हाला कधीच सांगणार नाहीत.’

(क्रमशः)

– श्री. मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.

भाग ७. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/860214.html