Mehbooba Mufti On Bangladesh : ‘बांगलादेश आणि भारत येथे अल्‍पसंख्‍यांकांवर अत्‍याचार होत असल्‍याने दोघांत काहीच भेद नाही !’ – मेहबुबा मुफ्‍ती

जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबुबा मुफ्‍ती यांच्‍या उलट्या बोंबा !

जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबुबा मुफ्‍ती

जम्‍मू – बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत आहेत. इथेही अल्‍पसंख्‍यांकांवर अत्‍याचार होत असतील, तर भारत आणि बांगलादेश यांत काय भेद रहाणार? मला भारत आणि बांगलादेश यांच्‍यात काही फरक दिसत नाही, असे विधान जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबुबा मुफ्‍ती यांनी केले. मुफ्‍ती मेहबुबा यांनी संभल (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचार आणि अजमेर दर्ग्‍याविषयीची याचिका यांचा उल्लेख करत हे विधान केले. मेहबुबा मुफ्‍ती पुढे म्‍हणाल्‍या की, देशात बेरोजगारी शिगेला पोचली आहे. शिक्षण आणि आरोग्‍य यांची स्‍थितीही बिकट आहे. रस्‍त्‍यांची दूरवस्‍था झाली आहे, तरीही मंदिराच्‍या शोधात मशीद पाडावी लागली आहे. (पाकिस्‍तान आणि बांगलादेश येथील आर्थिक स्‍थिती वाईट असतांनाही ते हिंदूंच्‍या मागे लागले आहेत, याविषयी मेहबुबा मुफ्‍ती यांनी तोंड उघडावे ! काश्‍मीरमध्‍ये होणारा विकास हिंदूंच्‍या पैशाने होत आहे, हेही त्‍यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक) हिंदु आणि मुसलमान सर्व धर्माचे लोक ८०० वर्षे जुन्‍या अजमेर शरीफ दर्ग्‍याला भेट देतात; पण काही जणांनी तेथे मंदिर आहे, या आशाने तेही खोदायला चालू केले.

संपादकीय भूमिका

  • जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ३४ वर्षांपूर्वी अल्‍पसंख्‍य हिंदूंना मुसलमानांनी पलायन करण्‍यास भाग पाडले, याविषयी मेहबुबा मुफ्‍ती यांनी आतापर्यंत कधी क्षमायाचना केली आहे का ?
  • भारतात जेथे हिंदू अल्‍पसंख्‍य आहेत, तेथे ते असुरक्षित आहेत. जेथे मुसलमान अल्‍पसंख्‍य आहे, तेथे ते बहुसंख्‍य हिंदूंवरच दादागिरी करत आहेत, अशीच स्‍थिती आहे ! याविषयी देशातील एकतरी मुसलमान नेता कधी तोंड उघडतो का ?