पालिकेच्‍या ६ सहस्र कर्मचार्‍यांना निवडणुकीच्‍या कामातून मुक्‍त करावे ! – मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेची निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती  

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्‍या कामांसाठी मुंबई महापालिकेच्‍या ६० सहस्र कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. त्‍यामुळे महापालिकेची विभागस्‍तरावरील अनेक कामे खोळंबली होती. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन ८ दिवस होऊनही ६ सहस्र कर्मचार्‍यांची या कामांतून मुक्‍तता करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे निवृत्तीवेतनासह अन्‍य कामे खोळंबली आहेत. या कर्मचार्‍यांना निवडणुकीच्‍या कामातून मुक्‍त करावे, अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे.