Hindu Girl Abused In Christian Orphanage : नर्मदापुरम (मध्‍यप्रदेश) येथील ख्रिस्‍ती संस्‍थेच्‍या अनाथाश्रमात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण

  • राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे माजी अध्‍यक्ष प्रियांक कानूनगो यांची माहिती

  • मुलीचे धर्मांतर करण्‍याचा कट रचल्‍याचाही आरोप

नर्मदापुरम (मध्‍यप्रदेश) – जिल्‍ह्यातील इटारसी येथे कार्यरत असलेल्‍या एका ख्रिस्‍ती मिशनरी संस्‍थेत मुलीचे लैंगिक शोषण करण्‍यात आले. त्‍यानंतर तिचे धर्मांतर करण्‍याचा कट रचला आहे, असा आरोप राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे माजी अध्‍यक्ष प्रियांक कानूनगो यांनी केला. या संस्‍थेमध्‍ये एका हिंदु अल्‍पवयीन मुलीचा बलात्‍कार करण्‍यात आला; मात्र त्‍याविषयी संस्‍थेने पोलीस ठाण्‍यात तक्रार केली नाही. याचे प्रमुख कारण म्‍हणजे लैंगिक शोषणानंतर मुलीवर दबाव आणून तिचे धर्मांतर करण्‍याचा संस्‍थेचा कुटील हेतू होता, असे कानूनगो यांनी म्‍हटले आहे.

१. प्रियांक कानूनगो यांनी ‘एक्‍स’वर प्रसारित केलेल्‍या ‘पोस्‍ट’मध्‍ये म्‍हटले आहे की,    नर्मदापुरममध्‍ये ख्रिस्‍ती मिशनरी संस्‍थेकडून चालवण्‍यात येणार्‍या अनाथाश्रमात रहाणार्‍या एका निराधार हिंदु मुलीचे तेथून एका ख्रिस्‍ती तरुणाने अपहरण केले.

२. काही दिवसांनंतर मुलीला बलात्‍कारी तरुणाच्‍या बहिणीच्‍या देखरेखीखाली ठेवण्‍यात आले. ४ दिवसांनी आरोपी ख्रिस्‍ती मुलाने त्‍या पीडित हिंदु  मुलीला तेथून त्‍याच्‍या घरी नेले. तिथे त्‍याने आठवडाभर तिच्‍यावर बलात्‍कार केला.

३. या संपूर्ण प्रकरणात जिल्‍हा प्रशासन, जिल्‍हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी निष्‍काळजीपणा केला. हे मानवी तस्‍करीचे प्रकरण आहे. तुष्‍टीकरणामुळे अधिकार्‍यांनी ख्रिस्‍ती संस्‍थेला वाचवण्‍याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रियांक कानूनगो यांनी केला आहे. (ख्रिस्‍तीधार्जिणे प्रशासन ! – संपादक)

४. पीडित मुलीने केलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. यापूर्वीही या आरोपीच्‍या विरोधात बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. (याचे अन्‍वेषण करून पोलिसांनी त्‍याच वेळी कारवाई केली असती, तर बलात्‍कारी तरुण असे कृत्‍य करण्‍यास पुन्‍हा धजावला नसता ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

ख्रिस्‍ती संस्‍था या अनाचारी कृत्‍यांचा अड्डा बनल्‍या आहेत, याचे आणखी एक उदाहरण. अशा संस्‍थांच्‍या विरोधात निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !