राजस्थानच्या भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला दिली संमती
१० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
जयपूर (राजस्थान) – राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती दिली आहे. हे विधेयक विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. धर्मांतरासाठी बाध्य करणार्यांना १ ते ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलाचे धर्मांतर झाल्यास शिक्षा ३ ते १० वर्षांपर्यंत असेल. धर्मांतरासाठी नवे नियम असतील. धर्मांतर करायचे असल्यास ६० दिवस आधी परिसरातील जिल्हाधिकारी यांना कळवावे लागणार आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या रक्षणासाठी कायदे करणे आवश्यक आहे तितकेच त्याची कठोरपणे कार्यवाही करणेही आवश्यक आहे. देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदा असतांनाही मोठ्या प्रमाणात गोहत्या होऊन गोमांसाची तस्करी अद्यापही चालू आहे. तसेच धर्मांतरविरोधी कायदे काही राज्यांत झाले असतांना तेथेही धर्मांतर थांबलेले नाही, याचा विचार करणेही आवश्यक आहे ! |