कु. वैष्णवी गोडळकर हिची तलवारबाजी स्पर्धेसाठी ‘खेलो इंडिया’मध्ये निवड !
नगर – येथील ‘लाल मातीच्या तालमी’चे वस्ताद पै. तुकाराम गोडळकर यांची नात कु. वैष्णवी सुनील गोडळकर हिची जम्मू येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फेन्सिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप’ स्पर्धेतून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम, देहलीसाठी निवड झाली आहे.
विश्व हिंदु महासंघाचे गोरक्षा विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. मिलिंद चवंडके, तसेच श्री. गोविंदराव मिसाळ, श्री. राजेंद्र भागानगरे, श्री. बाळासाहेब दहिंडे या सर्वांनी कु. वैष्णवी हिला, ‘लिंगायत गवळी समाजाचे नाव उंचावण्याचे कार्य तुझ्याकडून घडले आहे. खेलो इंडियासाठी पुष्कळ शुभेच्छा’, अशा शब्दांत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. समाजबांधवांनी आपलेपणाने घरी येऊन केलेल्या या कौतुक सोहळ्याने तिचे वडील श्री. सुनील तुकाराम गोडळकर आणि आई सौ. सुनंदा गोडळकर यांना पुष्कळ आनंद झाला.