राक्षेवाडीत (पुणे) मोटारीत आढळले १,२५० किलो गोमांस !

(प्रतिकात्मक चित्र)

कडूस (जिल्‍हा पुणे) – खेड तालुक्‍यातील राजगुरुनगरलगतच्‍या राक्षेवाडी गावच्‍या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गाच्‍या सेवा रस्‍त्‍यावर गोमांसाची अवैधरित्‍या वाहतूक करणारी इनोव्‍हा मोटार पोलिसांना २९ नोव्‍हेंबर या दिवशी आढळली. पोलिसांनी या मोटारीसह वाहनातील १,२५० किलो गोमांस कह्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्‍यात अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका :

राजरोसपणे होणारी गोहत्‍या आणि गोमांसाची विक्री थांबवण्‍यासाठी गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्‍यक !