तळमळीने सेवा करणार्या आणि गुरुदेवांच्या प्रती दृढ श्रद्धा असलेल्या सौ. प्राची हेमंत जुवेकर (वय ६१ वर्षे) !
१. सहनशील
‘सौ. जुवेकरकाकूंना गुडघ्यांमध्ये असह्य वेदना होत असतात. काकू त्यांना होत असलेल्या वेदनांविषयी स्वतःहून कुणालाही सांगत नाहीत. त्यांना त्रास होत असूनही त्या कधीही सेवेत सवलत घेत नाहीत.
२. त्यांना मायेतील गोष्टींविषयी आसक्ती अल्प आहे.
३. साधकांना आधार देणे
त्या प्रत्येक सेवा करायला तत्पर असतात. त्या प्रत्येक वेळी मला साहाय्य करण्यास सिद्ध असतात. मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
४. विचारण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती
काकूंना सेवेचा पुष्कळ अनुभव आहे, तरीही त्या सेवेसंबंधित सूत्रे उत्तरदायी साधकांना विचारतात आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. त्या अन्य साधकांनी सांगितलेली सूत्रे स्वीकारतात.
५. काकूंच्या जीवनात अत्यंत कठीण प्रसंग आले, तरीही त्यांची गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) दृढ श्रद्धा आहे.
६. सेवेची तळमळ
काकू दिवसभरातील अधिकाधिक वेळ सेवा करतात. त्यांना दिवसभरात कधी विश्रांतीची आवश्यकता भासत नाही. एकदा काकूंना कंबरेत तीव्र वेदना होत होत्या. तेव्हा आधुनिक वैद्यांनी काकूंना विश्रांती घ्यायला सांगितली. त्या वेळी काकू पलंगावर आडवे पडून सेवा करत होत्या. त्या सेवेसाठी कितीही कष्ट घ्यायला सिद्ध असतात.
गुरुदेवांच्या कृपेने मला सौ. जुवेकरकाकूंचे गुण लक्षात आले. ‘गुरुदेवा, काकूंमधील गुण मलाही आत्मसात करता यावेत’, यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्यावेत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सानिका संजय सिंह, सनातन आश्रम, वाराणसी (२८.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |