वाराणसी आश्रमातील सौ. प्राची जुवेकर (वय ६१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – २५ नोव्हेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणदिनी वाराणसी आश्रमातील साधिका सौ. प्राची हेमंत जुवेकर या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केली. ही आनंदवार्ता ऐकल्यानंतर उपस्थित साधकांची भावजागृती झाली. निष्काम आणि समर्पित भाव, अखंड सेवारत अन् तीव्र तळमळ असणार्या सौ. प्राची जुवेकर या मागील २५ वर्षांपासून धर्मप्रचाराची सेवा करत आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंबीयही साधनारत आहेत.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना सौ. प्राची जुवेकर म्हणाल्या की, ‘‘हे सर्व काही गुरुदेवांच्या कृपेमुळेच झाले आहे’’. या वेळी ‘ऑनलाईन’ जोडलेले सौ. प्राची जुवेकर यांचे पती श्री. हेमंत जुवेकर, पुत्र श्री. प्रशांत जुवेकर आणि सून सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनीही मनोगत व्यक्त केले.