रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. देवराज बी. एस्. (उद्योगपती), कुणीगल, तुमकुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रम कसे असायला हवेत ? आणि अध्यात्म कसे जगायला पाहिजे ?’, हे लक्षात आले.
आ. ‘आताच्या पिढीला आणि भरकटलेल्या समाजाला अशा आश्रमांची पुष्कळ आवश्यकता आहे.’ हे साध्य करण्यासाठी ‘भगवंताची कृपा आवश्यक आहे’, हे लक्षात आले.
इ. आश्रम ‘समाजाला आवश्यक आहे’, ते शिक्षण देत आहे.
ई. आश्रमातील सर्व साधकांना पाहून त्यांच्यातील प्रीती अनुभवायला मिळाली.
उ. आश्रमजीवन पाहून माझ्यामध्येही चांगले पालट जाणवले.’
१. श्री. पुनीत केरहळ्ळी (संस्थापक आणि अध्यक्ष, राष्ट्र रक्षा पदे [राष्ट्र रक्षा दल]), बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘मी आश्रमात दुसर्यांदा आलो आहे. इथे आल्यावर माझ्यात सकारात्मक शक्ती वाढली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |