उरण येथे ४ घरांमध्ये चोरी !

वर्षभरापूर्वीही असाच प्रकार घडल्याचे उघड !

प्रतिकात्मक छायाचित्रं

उरण – येथील वेश्वी गावातील ४ घरांमध्ये अज्ञात चोरांनी घरफोडी केली. चोरांनी बंद घरांच्या कड्या आणि खिडक्यांचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी २५ लाख रुपयांचा ऐवज चोरला. त्यांची ही कृती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे. ही घटना २८ नोव्हेंबरच्या रात्री घडली. गेल्या वर्षीही येथे अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे तेथे गावकरी रात्रभर जागरण करायचे. काही संतप्त नागरिकांनी चोरीसाठी वापरली जाणारी गाडीसुद्धा जाळून टाकली होती; मात्र तेव्हा चोरट्यांनी अंधाराचा अपलाभ घेऊन पळ काढला होता.

संपादकीय भूमिका

चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा !