१० महिन्यांत १५ सहस्र प्रवाशांनी केला विनातिकीट प्रवास !

पुणे – पी.एम्.पी.मधून (पुणे महानगर परिवहन) विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्या प्रतिवर्षी वाढतच आहे. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत अंदाजे १५ सहस्रांहून अधिक प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला आहे. पी.एम्.पी. प्रशासनाने त्यांच्याकडून ७६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे. पी.एम्.पी.कडून स्वस्त दरात सेवा दिली जाते; मात्र तरीही काही प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. पी.एम्.पी. प्रशासन सातत्याने पडताळणी मोहीम राबवून दंड वसूल करते; मात्र तरीही विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्या अल्प होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे पी.एम्.पी. प्रशासनाने सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त ठोस उपाययोजना करायला हवी, तरच विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्या अल्प होईल !