सांगली येथे मद्याच्या बाटलीसाठी उपाहारगृहातील नोकराचा खून !
सांगली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – एका मद्याच्या बाटलीसाठी उपाहारगृहातील एका नोकराचा खून करण्यात आला आहे. शैलेश राऊत (वय २६, रा. बेनीखुर्द, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. शैलेश हा सध्या सांगली येथील सावंत प्लॉट, परिजात कॉलनी येथे रहात होता. या प्रकरणी पोलिसांनी सुमित मद्रासी (वय २३ वर्षे, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली), सौरभ कांबळे (वय २२ वर्षे, रा. १०० फुटी रस्ता, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) आणि १५ वर्षांचा एक अल्पवयीन गुन्हेगाराला अटक केली आहे. शैलेश राऊत आणि सर्व आरोपी २८ नोव्हेंबर या दिवशी मद्य पित असतांना शैलेश याने आरोपींकडे आणखी एक मद्याची बाटली आणून देण्याची मागणी केली. आरोपींनी ती आणण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात झटापटी झाली. या वेळी आरोपींनी चाकूचे वार करून शैलेश याचा खून केला.