ठाणे पोलिसांच्या कारवाईतून ७० गुन्ह्यांची उकल !

  • ३ धर्मांधांसह १ कह्यात !
  • ५० लाख १८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करायला हवी !

ठाणे – ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने कुख्यात चोरट्यांना शोधून काढले आहे. अशा गुप्त कारवाईतून ७० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि शीळ डायघर परिसरातून सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र सापडले आहे. ५० लाख १८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संपूर्ण कारवाईच्या वेळी पोलिसांनी संशयित तौफीक तेजीब हुसेन, महंमद अली उपाख्य कालीचरण झवेरी अली, अब्बास सल्लू जाफरी आणि सूरज उपाख्य छोट्या मनोज साळुंखे यांना कह्यात घेतले. सर्व आरोपींनी सोनसाखळी चोरीचे ४० गुन्हे, भ्रमणभाष चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ६ गुन्हे अशा ७० गुन्हे केल्याचे मान्य केले.