पुणे येथे दोघांकडून १५ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत !

पुणे – ‘मॅफेड्रॉन’ हा अमली पदार्थ बाळगणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. बॉबी सुरवसे आणि तौसिम खान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ लाख ६० सहस्र रुपयांचे ‘मॅफेड्रॉन’, पिस्तुल आणि २ काडतुसे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.