‘सनातन प्रभात’ला इतर वृत्तपत्रांप्रमाणे स्वत:च्या तत्त्वांपासून कधीच माघार घ्यावी लागली नाही !

।। श्रीराम समर्थ ।।

‘सनातन प्रभात’ म्हणजे गेली अडीच दशके हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी श्रद्धेने कार्य करणारे दैनिक ! महाभारतात श्रद्धेची व्याख्या अतिशय सुंदररित्या केली आहे. मृत्यूच्या महाद्वारांतसुद्धा जिला तडा जात नाही, तिला ‘श्रद्धा’ म्हणतात. त्याचप्रमाणे गेली २५ वर्षे ‘सनातन प्रभात’ नष्ट करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची वादळे सर्व दिशांनी आली; पण सनातनची हिंदु राष्ट्रावरील श्रद्धा नष्ट झाली नाही. उलट तापल्यानंतर सोने उजळून निघते, त्याप्रमाणे सनातनची कीर्ती उजळून निघाली. २५ वर्षांत एकदाही सनातनला इतर वृत्तपत्रांप्रमाणे स्वत:च्या तत्त्वांपासून कधीच माघार घ्यावी लागली नाही.

श्री. विद्याधर नारगोलकर

समर्थ म्हणतात,

सोने आणि सोन पितळ ।
दिसती ते एकच केवळ ।
परी सोन पितळ्यास मिळताच जाळ ।
काळीमा चढे ।। श्रीराम ।।

‘सनातन प्रभात’ वाचन करतांना ३ गोष्टी आढळून येतात. पहिल्या पानावर जगातील हिंदूंविषयीच्या बातम्या आणि हिंदूंनी कसे वागावे ? हे समजते म्हणजे ‘माणूसपण’ समजते. दुसरे पान आणि अग्रलेख वाचतांना ‘मोक्षाची’ इच्छा निर्माण होते. नंतरचे पान वाचतांना सज्जनांची संगत होते. या आद्य शंकराचार्यांनी सांगितलेल्या दुर्मिळ गोष्टी सद्गुरूंच्या कृपेने आपोआप मिळतात. आपण देह पातळीवर ‘दास’ होतो, जीव पातळीवर ‘अंश’ होतो आणि आत्मपातळीवर मी म्हणजे तुम्ही अन् तुम्ही म्हणजेच मी असा भाव अंत:करणात सद्गुरुकृपेने येतो. शेवटी ‘सनातन प्रभात’ हा उंबर्‍यावर ठेवलेला दिवा आहे. तो घरातसुद्धा प्रकाश देतो आणि अंगणातही प्रकाश पाठवतो. हिंदु राष्ट्रासाठी तो घरात कुणाला घ्यावे ? आणि घरातून धक्के मारून कुणाला बाहेर काढावे ? ते सांगतो.

यासाठी ‘सनातन प्रभात’ला अंतःकरणापासून नमस्कार ! याचा प्रसार सर्व हिंदूंच्या हृदयात होवो, हीच त्या जगनियंत्रकाच्या चरणी प्रार्थना !

सावध चित्ते शोधावे । शोधोनी अचूक वेचावे ।
वेचोनी उपयोगावे । ज्ञान काही ।
।। श्रीराम ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आपला चरणरज,

श्री. विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा.