वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर मुसलमानांच्या अवैध बांधकामावर प्रशासनाचा हातोडा !
मुंबई – पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे रेल्वेस्थानकाला लागून पूर्व भागातील ४५ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेने तोडली. २८ नोव्हेंबर या दिवशी रेल्वे पोलीसांच्या पहार्यामध्ये ‘जेसीबी’ यंत्राच्या साहाय्याने प्रशासनाने ही अवैध बांधकामे पाडली. (एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे कशी होतात ? हेही शोधायला हवे ! – संपादक) या ठिकाणी अन्यही काही अवैध बांधकामे आहेत. रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बांधकामे धोकादायक आहेत. त्यामुळे ही बांधकामे हटवण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. वांद्रे रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला उड्डाणपुलाच्या जवळ ही अवैध बांधकामे उभारण्यात आली होती. या ठिकाणी काही बांगलादेशी घुसखोरही स्थायिक झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.