गडहिंग्लजमध्ये (जिल्हा कोल्हापूर) शहेजाद शेख याच्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद !
संतप्त जमावाने शेख काम करत असलेले दुकान फोडले
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – मूळचा उत्तरप्रदेश येथील असणारा आणि प्लास्टर ऑफ पॅरीसचे काम करणार्या शहेजाद शेख (वय २६ वर्षे) याने एका अल्पवयीन युवतीची छेड काढल्याचे समोर आले. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक यांनी एकत्र येऊन शेख ज्या ठेकेदाराकडे काम करतो, त्या बरकतअली रईस पाशा (मूळ गाव उत्तरप्रदेश सध्या गडहिंग्लज) याला जाब विचारला. या वेळी जमावाला शहेजाद शेख पळून गेल्याचे कळताच संतप्त जमावाने ठेकेदाराच्या दुकानावर आक्रमण करून ते फोडले. या प्रकरणी ठेकेदार बरकतअली रईस पाशा आणि शहेजाद शेख या दोघांवरही ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची वारंवारता पहाता जोपर्यंत असे करणार्यांना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणे कठीण आहे ! अशा घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवून तात्काळ शिक्षा दिल्यासच समाजात गुन्हे न करण्यासाठी जरब बसेल ! – संपादक)
१. ८ दिवसांपूर्वी शहेजाद शेख याने एका मुलीचे ती कपडे धूत असतांना तिचे भ्रमणभाषमध्ये छायाचित्र काढले होते. त्या मुलीने छायाचित्र पुसून (डिलीट) टाकण्यास सांगितल्यावर त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार तो काम करत असलेला ठेकेदार बरकतअली रईस पाशा याला समजल्यावर त्याने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली नाही, तसेच पाशा याने शहेजाद याला मारहाण केली. यामुळे शहेजाद पळून गेला.
२. ही घटना हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांना कळल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ‘या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक झाल्याविना येथून जाणार नाही’, अशी ठाम भूमिका घेतली. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागेश चौगुले, तसेच संतोष चिकोडे यांसह हिंदुत्वनिष्ठांनी कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. (गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होण्यासाठी ठाम भूमिका घेणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)
३. अखेर मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यावर दोघांवर गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतरच नागरिक परत गेले.