पर्वरी (गोवा) येथे ३० नोव्हेंबरला होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सवी सन्मान !

  • सनातन संस्थेचा साजरा होणार रौप्यमहोत्सवी सोहळा !

  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत असणार उपस्थित

रामनाथी (गोवा) – गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्‍या सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा शनिवार, ३० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता पर्वरी येथील सुकूर ग्रामपंचायत सभागृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते स्वामीजींचा सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री. सदानंद तानावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची या सोहळ्याला वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात अमृतमहोत्सवी सन्मानानिमित्त प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे होणारे मार्गदर्शन म्हणजे गोमंतकियांसाठी अमूल्य पर्वणीच आहे. या अमूल्य क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गोमंतकियांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.