British MP Condemns Ban On ISKCON : ‘इस्कॉन’वर बांगलादेशात बंदी घालण्याच्या प्रयत्नांवरून मी चिंतित !
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांचे ब्रिटीश संसदेत वक्तव्य
लंडन (ब्रिटन) – बांगलादेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कारागृहात टाकल्याच्या घटनेचा मी निषेध करतो. ‘इस्कॉन’वर बांगलादेशात बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका तेथील उच्च न्यायालयात प्रविष्ट झाल्यावरून मी चिंतित आहे. जागतिक स्तरावर धर्मस्वातंत्र्य जपले पाहिजे, असे महत्त्वपर्ण विधान ब्रिटनमधील हॅरो ईस्टचे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी तथील संसदेत केले. त्यांनी त्यांच्या विधानाचा व्हिडिओ ‘एक्स’वरून पोस्ट केला आहे.
या वेळी ब्लॅकमन यांनी म्हटले की, बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या स्थितीवर ब्रिटीश संसदेने लेखी विधान केले आहे. मी संसदेला आवाहन करतो की, तिने यावर प्रत्यक्ष भाष्यही करावे. याआधी आफ्रिकी वंशाच्या प्रसिद्ध अमेरिकी गायिका मेरी मिलबेन यांनीही बांगलादेशातील हिंदूंच्या व्यथेविषयी आवाज उठवला होता.
संपादकीय भूमिकाभारतात योगी आदित्यनाथ, पवन कल्याण यांसारखे बोटावर मोजण्याएवढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोडले, तर बांगलादेशातील हिंदूंविषयी येथील नेते काहीच विधान करत नाहीत. यातून येथील नेत्यांना हिंदुत्वरक्षणाची तळमळ आहे कि नाही, असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे ! |