तुमच्या धर्माचे पालन करा आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगा ! – Karnataka CM Siddaramaiah
डॉ. आंबेडकर यांच्या हवाल्याने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान
बळ्ळारी (कर्नाटक) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये म्हटले आहे की, ‘तुमच्या धर्माचे पालन करा आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगा.’ इतर धर्मांचा स्वीकार करण्याची सहिष्णुता असावी. स्वतःच्या धर्माचे पालन करतांना इतर धर्मांना सन्मान द्यावा. जर आपण सर्वांना सन्मान दिला, तर आंबेडकर, राज्यघटना आणि धर्मगुरु यांनाही सन्मान दिल्यासारखे होईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते येथे ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, काही जण म्हणतात की, सिद्धरामय्या मुसलमान आणि ख्रिस्ती यांना पाठिंबा देतात अन् हिंदूंना विरोध करतात; पण हे खोटे आहे. मी सर्वांवर प्रेम करतो. धर्मांधता आणि विषमता या आपल्या समाजातील जातीव्यवस्थेमुळे उद्भवलेल्या समस्या आहेत. (देशातील जातीव्यवस्था नष्ट करण्याऐवजी सर्व राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी जातीचेच राजकारण करत आले आहेत आणि करत रहाणार आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|