पुणे येथे २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या ६० वर्षीय नागरिकाला अटक !
पुणे – घराबाहेर खेळणार्या २ अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी ६० वर्षीय नागरिकाला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
आरोपी मुलींना चॉकलेटचे आमीष दाखवून वेळोवेळी घरी नेऊन अत्याचार करत असे. काही दिवसांनी मुलींनी झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
संपादकीय भूमिकामुली आणि महिला यांना घर अन् परिसर ही ठिकाणेही असुरक्षित बनणे हे संतापजनक आहे ! ज्येष्ठ नागरिकांनी असे कृत्य करणे हे नात्याला अशोभनीय ! |