एन्.एम्.एम्.टी.ची उरण बस सेवा प्रवाशांच्या सेवेत !

नवी मुंबई – खोपटे गावात झालेल्या अपघातानंतर फेब्रुवारीपासून बंद असलेली एन्.एम्.एम्.टी.ची उरण बससेवा २७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे. ३१ क्रमांकाची कोपरखैरणे ते उरण आणि ३० क्रमांकाची कळंबोली ते उरण या मार्गांवर ही बस सेवा चालू झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई ते उरण दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्या या दोन्ही मार्गांवर ५ बसगाड्या देण्यात आल्या असून दर अर्ध्या ते पाऊण घंट्याने त्या या मार्गावर धावतील.