प्रियकराच्या छळाला कंटाळून वैमानिक तरुणीची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – एअर इंडियामध्ये वैमानिक असणार्‍या तरुणीने तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्यात वाद होत असल्याने प्रियकराने तिला ‘व्हॉट्सॲप’वर ‘ब्लॉक’ केले होते. याचा मानसिक धक्का बसल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. सृष्टी तुली असे तिचे नाव होते, तर आदित्य पंडित हा तिचा प्रियकर होता. मुलीच्या कुटुंबियांनी प्रियकराच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका

मेकॉलेप्रणित उच्चशिक्षणाचा परिणाम ! मनोबल वाढण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक !