पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा मुंबई पोलिसांना दूरध्वनी !
महिलेला अटक !
मुंबई – मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये २७ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारणार असल्याचा दूरध्वनी आला. या प्रकरणी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथून एका महिलेला कह्यात घेतले आहे. कौटुंबिक वादामुळे मानसिक परिणाम होऊन महिलेने अशा प्रकारे दूरध्वनी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याविषयी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. यापूर्वीही कर्नाटक येथील महंमद रसूल कद्दारे याने पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यालाही पोलिसांनी अटक केली होती.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण केल्यासच मुंबई पोलिसांना येणारे धमकीचे दूरभाष आपोआप बंद होतील, हेच खरे ! |