‘कालनिर्णय’ विकू नये, तसेच हिंदूंनीही त्यावर बहिष्कार टाकावा ! – अमित कुंभार, बजरंग दल, जिल्हा संयोजक, कोल्हापूर

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंच्या देवतांवर अश्लाघ्य टीका करणार्‍या आणि लाखो स्वामी भक्तांच्या भावना दुखावणारे ज्ञानेश महाराव यांना ‘कालनिर्णय’चे जयंत साळगावकर यांनी पुरस्कार देणे हे निश्चितच योग्य नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही विक्रेत्यांनी ‘स्टॉल’वर ही दिनदर्शिका विक्रीसाठी ठेवू नये, तसेच हिंदूंनी त्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करत आहोत. या संदर्भात आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात प्रबोधन करत आहोत, असे मत बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. अमित कुंभार यांनी व्यक्त केले आहे.

‘लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशन’ने वर्ष २०२४ चा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार हिंदूंच्या देवता-संत यांवर गरळओक करणार्‍या जात्यंध ज्ञानेश महाराव यांना दिला. याविषयी धर्मप्रेमी हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला.