Indian Navy Nuclear Missile Test : भारताने घेतली अण्‍वस्‍त्रवाहू क्षेपणास्‍त्राची यशस्‍वी चाचणी

नवी देहली – भारतीय नौदलाने प्रथमच आण्विक पाणबुडी ‘अरिघात’वरून अण्‍वस्‍त्र डागू शकणार्‍या बॅलेस्‍टीक क्षेपणास्‍त्राची यशस्‍वी चाचणी केली. या क्षेपणास्‍त्राची मारक क्षमता ३ सहस्र ५०० कि.मी. आहे. जर भूमीवरून आक्रमण करण्‍यासारखी परिस्‍थिती नसेल, तर पाण्‍यातून शत्रू देशावर अण्‍वस्‍त्र आक्रमण करण्‍याची या क्षेपणास्‍त्राची क्षमता आहे.

भारत कुणावरही प्रथम अण्‍वस्‍त्रांद्वारे आक्रमण करणार नाही, असे भारताचे धोरण आहे; परंतु भारतावर कुणी अण्‍वस्‍त्रांद्वारे आक्रमण केले, तर भारत त्‍यांना सोडणार नाही. त्‍यामुळे अशा आक्रमणासाठी हे क्षेपणास्‍त्र महत्त्वाचे मानले जात आहे.