पंडित नेहरू यांना जागतिक शांततेसाठी गोव्याचा बळी द्यायचा होता का ? – राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई
गोव्याच्या स्वातंत्र्याला १४ वर्षे विलंब झाल्याचे प्रकरण
पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्याच्या स्वातंत्र्याला १४ वर्षे विलंब का झाला ? भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जागतिक शांततेसाठी गोव्याचा बळी द्यायचा होता का ? असा प्रश्न गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डिसेंबर डाऊन’ या गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर आधारित माहितीपटाच्या ‘पोस्टर’चे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक शारदाताई सावईकर आणि रोहिदास रघुनाथ नाईक उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, ‘‘पंडित नेहरू त्या वेळी गोव्यात सैन्य कारवाईसाठी इच्छुक नव्हते; पण जागतिक शांततेच्या नावाने गोव्याचा बळी द्यायचा का ? गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास भारतीय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे.
काय आहे ‘डिसेंबर डाऊन’ माहितीपट ?
‘डिसेंबर डाऊन’ माहितीपट भारतीय सैनिकांनी गोव्याच्या मुक्तीसाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन विजय’वर आधारित आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन दिनेश भोसले यांनी
केले आहे.