Israel- Hezbollah Cease Fire : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम

हिजबुल्लाने करार मोडल्यास इस्रायल पुन्हा आक्रमण करणार ! – इस्रायलची स्पष्टोक्ती

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधील युद्धविराम कराराला इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाने संमती दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच युद्धविरामाला संमती दिली आहे. त्याच वेळी नेतान्याहू म्हणाले की, हिजबुल्लाने कराराचे उल्लंघन केल्यास आम्ही पुन्हा आक्रमण करू. नेतान्याहू म्हणाले की, इराणवर लक्ष केंद्रित करणे, थकलेल्या राखीव सैनिकांना विश्रांती देणे, ही युद्धविरामाची प्रमुख कारणे आहेत.