सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासमवेत होणार बैठक !
मुंबई – महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी २८ नोव्हेंबर या दिवशी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुखांची भाजपचे वरिष्ठ नेते अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत देहली येथे बैठक होणार आहे, अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद यांविषयी अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.