त्याग आणि संन्यास म्हणजे काय ?
आसक्ती किंवा फलाकांक्षा टाकून कर्म करणे, हीच खरी विरक्ती आणि संन्यास आहे. त्याग आणि संन्यास शब्द वेगळे असले, तरी दोन्हीत तत्त्वतः काही वरवर थोडा भेद दिसतो. तो व्यक्ती वा प्रकृती विशेषाप्रमाणे सोपा किंवा अवघड वाटतो अथवा तसे सांगितले जाते; पण मुळात दोन्ही एकरूपच आहेत. काम्य कर्माचा त्याग, म्हणजे संन्यास आणि सर्व कर्मांविषयीचा फलत्याग म्हणजे त्याग.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘जीवनसाधना’)