गुरूंपेक्षा गुरूंनी सांगितलेल्या उपास्यदेवतेची भक्ती अधिक करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘गुरूंपेक्षा गुरूंनी ज्या देवतेचा नामजप करायला सांगितला असेल, त्या देवतेची भक्ती अधिक करायला हवी आणि त्या देवतेवरच अधिक श्रद्धा हवी; कारण ‘गुरु’ हे ईश्वराकडे घेऊन जाणारे मार्गदर्शक तत्त्व आहे, तर ‘देवता’ हे ईश्वराचे सगुण रूप आहे. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी प्रथम त्याच्या सगुण रूपाशी एकरूप होणे आवश्यक असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले