गायनाचा सराव करतांना हिंदी चित्रपटातील गीतात गाण्याच्या परिणामकारकतेसाठी शब्दांच्या अर्थांसमवेत त्याच्या उच्चारालाही तेवढेच महत्त्व असणे, भक्तीगीत आणि प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाच्या गायनाचा सराव करतांना शब्दांच्या उच्चारांपेक्षा भावाची जोड अधिक परिणामकारक ठरल्याविषयी साधकाला आलेले अनुभव
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आणि देवाच्या कृपेमुळे माझ्या गायनाच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पहिल्या प्रयोगात हिंदी चित्रपटातील गाणे, दुसर्या प्रयोगात भक्तीगीत आणि तिसर्या प्रयोगात प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाचा ‘प्रयोगात सहभागी झालेल्या आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. गायनाचा सराव करतांना आलेले अनुभव पुढे देत आहे.
१. हिंदी चित्रपटातील गाण्याचा सराव
पहिल्या प्रयोगासाठी मी हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे निवडले होते. त्या गीतातील शब्द रज-तमप्रधान होते. गायनाचा सराव करतांना गीतातील केवळ शब्द गुणगुणत असतांना त्याचा माझ्या मनावर विशेष परिणाम होत नव्हता. त्यामुळे माझे मन स्थिर रहायचे. गाण्याशी एकरूप झाल्यानेच त्या गाण्याचा स्वतः आणि श्रोते यांवर होणारा परिणाम अभ्यासता येणार होता. त्यामुळे मी गीताच्या आशयाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करून गायकाने गीतात केलेल्या शब्दांच्या उच्चारांप्रमाणे शब्दांचा उच्चार करू लागलो. हे उच्चार मनातील भावना उद्देपित करणारे होते. त्यामुळे माझे स्थिर असलेले मन अस्थिर होऊन चंचल बनले आणि मनात वासनेचे विचार निर्माण होऊ लागले. तेव्हा गायनात शब्दांसमवेत त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चार पद्धतीलाही तितकेच महत्त्व असल्याचे लक्षात आले.
२. भक्तीगीत गायनाचा सराव
एका भक्ताने प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांवर आधारित एक भक्तीगीत लिहिले होते. या भक्तीगीतात प.पू. गोंदवलेकर महाराज यांची वर्णन केलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये यांत साम्य असल्याने मी हे भक्तीगीत कार्यक्रमासाठी निवडले होते. या भक्तीगीताचा सराव करतांना सातत्याने गुरुस्मरण होत असल्याने माझे शब्दांच्या उच्चारांपेक्षा भावाकडे लक्ष अधिक जात होते. त्यामुळे गायनाच्या सरावातून मला आनंद मिळत होता.
३. प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाच्या गायनाचा सराव
प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाच्या गायनाचा सराव करतांना दोन-तीन वेळा भजन म्हणताच माझ्याभोवतीचे त्रासदायक आवरण दूर व्हायचे आणि मनाला आनंद जाणवत होता. भजनातील शब्दांच्या उच्चारांकडे लक्ष जात नव्हते, तर भजनाला भावाची जोड आपोआप मिळू लागल्याने भजन गातांना अधून-मधून माझा भाव जागृत होत होता किंवा माझ्या मनाला आनंद जाणवत होता.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|