हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली !
पुणे – हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ सहस्र रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. या संदर्भात तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार तरुण महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहातो. २४ नोव्हेंबरला तो दुपारी हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. त्या वेळी चोरट्यांनी त्याला मारण्याची धमकी देऊन सोनसाखळी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले याचे अन्वेषण करत आहेत. टेकड्यांच्या परिसरात लुटमारीच्या घटना घडत असल्याने टेकडीवर गस्त घालण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत, तसेच टेकडी परिसरात प्रखर दिवे बसवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
संपादकीय भूमिकाचोरट्यांना पोलिसांचे भय वाटत नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत ! |