पॅलेस्टाईनमध्ये घडणार्या घटनांवर बोलणारे बांगलादेशातील घटनांवर मौन बाळगतात !
आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची हिंदुद्वेष्ट्यांवर टीका
अमरावती (आंध्रप्रदेश) – चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक करण्याच्या प्रकरणी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, तिथे जे घडत आहे ते पाहून पुष्कळ वाईट वाटते. जर पॅलेस्टाईनमध्ये काही घडले, तर संपूर्ण ‘इको सिस्टिम’ (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) जागी होते; परंतु जेव्हा ते बांगलादेशामध्ये घडते, तेव्हा कुणीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही.